राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटल्याचं दिसत आहे. याविरोधात भाजपा युवा मोर्चातर्फे मोर्चा देखील काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सनातन आणि हिंदू धर्म वेगवेगळे असून त्यात गल्लत करू नका. मनुवादी सनातन्यांना आमचा विरोध आहे, असं म्हणत आव्हाडांनी मोर्चेकऱ्यांनाही सुनावलं.