Uday Samant: 'ही सभा झाल्यानंतर ठाकरेंची सभा...'; खेडमधील सभेपूर्वी उदय सामंतांची प्रतिक्रिया
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये केलेल्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबद्दल बोलताना शिवसेना नेते उदय सामंत यांनी 'खेडमधील सभा आज होणार असून याला विक्रमी गर्दी होणार आहे. कोकण हे शिवसेनेच्या विचारांच्या मागे आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे आहे हे सिद्ध होईल' असे वक्तव्य केले आहे #udaysamant #khed #uddhavthackeray #ramdaskadam