कोविडची भीती संपली नाही तोच आता नव्या H3N2 या विषाणूमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. H3N2 आणि कोविड १९ बाबत आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी डॅाक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करावेत. घाबरून जाऊ नये, असं आवाहन तानाजी सावंत यांनी
केलं आहे.