नेहमी आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत येणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी आता नवीन वक्तव्य करत वाद ओढावून घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यावर पदवी मिळत असली तरी सर्वांना काही नोकऱ्या मिळणार नाहीत असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरुणांना रोजगार देऊन स्वतः पायावर उभे करण्याचं काम केलं जाईल, असे म्हणत असतानाच सत्तार यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. "आता पदवी मिळाली आहे, पण सर्वाना काही नोकऱ्या मिळणार नाहीत”, असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभमध्ये केले. तर आपल्या या वक्तव्याचा अर्थ लक्षात येताच सत्तार यांनी नंतर सारवासारव देखील केली.
#AbdulSattar #EknathShinde #OldPensionScheme #DevendraFadnavis #BJP #GovernmentEmployees #DYChandrachud #SupremeCourt #Shivsena #BacchuKadu #AjitPawar #UddhavThackeray #Maharashtra