Sheetal Mhatre on morph video: 'त्या' व्हायरल व्हिडीओवर शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या...
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शीतल म्हात्रे यांनी आपला हा व्हिडीओ मॅार्फ केल्याचा आरोप करत दहिसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर यावर स्वतः शीतल म्हात्रेंनी आता भाष्य करत थेट ठाकरे गटाकडे बोट दाखवलं आहे.