नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. मात्र हा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना आहे भाजपाला नाही, अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केली. यावर आमदार रोहित पवारांनी आता सूचक विधान केलं आहे. पवार साहेब कधी काय मास्टरस्ट्रोक करतीय, याचा कोणालाही अंदाज लागू शकत नाही, असं ते म्हणाले. दरम्यान, या राजकारणामुळे शरद पवार यांच्या
भाजपाविरोधी भूमिकेवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.