'माझे यजमान गेल्यावर मला एक संघर्ष करावा लागला. मी तर मोठ्या घरातील होती, मोठ्या घरात माझं लग्न झालं होतं. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करता मी फार वंचित कधीच नव्हते. असं असूनही माझ्या मुलांची नावं सातबारावर लावण्यासाठी माझ्यासारख्या महिलेला आपल्या देशात अजूनही संघर्ष करावा लागतो' असे वक्तव्य करत यशोमती ठाकूर या सभागृहात भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या.