मुंबईतील शिवाजी पार्क येथे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून देशपांडेवरील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र,आता विधानसभेत देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केला आहे. देशपांडेंच्या हल्ल्यामागे वरुण सरदेसाई आहेत का, याची चौकशी करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
#SandeepDeshpande #NiteshRane #VarunSardesai #ShivajiPark #RajThackeray #BJP #MNS #Yuvasena #SyshantSinghRajput #DishaSalian #MaharashtraBudget #Adhiveshan #Politics #Shivsena #Maharashtra