अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. “देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या अटकेची चर्चा चालू होती. मी तेव्हा तिथे उपस्थित होतो. तेव्हा मी काय म्हणालो, हे मी आत्ता सांगत नाही, नंतर सांगेन”, असं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले होते. या आरोपांना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
#SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #Shivsena #BJP #SharadPawar #Alliance #Politics #MahavikasAghadi #Maharashtra