आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढणार आहे. यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी होईल की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. महाविकास आघाडी सत्तेत आलीच तर मुख्यमंत्री कोण होणार याचीही स्पर्धा आतापासून सुरू झाली आहे. ही स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते आहे. आधी जयंत पाटील आणि आता अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकू लागलेत. आता या दोन्ही नेत्यांपैकी मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस कोणामध्ये आहेत, हे समजून घेऊयात, इतकंच नाही तर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासह आणखी एक राष्ट्रवादीतील नाव मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धेत आहे. हे तिसरं नाव कोणाचं आहे आणि त्या नावाची का चर्चा आहे हे जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ.
#SharadPawar #AjitPawar #JayantPatil #SupriyaSule #NCP #Maharashtra #MahavikasAghadi #MVA #UddhavThackeray #Shivsena #CM #HWNews