'सत्ता संघर्षात काय होत ते बघुयात, इंटरेस्टिंग आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलून त्यांचं महत्व मला वाढवायचे नाही. अवघ्या देशाला माहीत आहे की १२ ज्योतिर्लिंग कुठे आहेत असं असताना ज्योतिर्लिंगाची जागा बद्दलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. गिरीश बापट यांना भेटून आलो होतो, त्यांची तब्येत बरी नाही' राज्यातील विविध मुद्यांवर अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.