चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपाच्या प्रतिष्ठेची आहे तितकीच राष्ट्रवादीच्या असं म्हणावी लागेल. म्हणूनच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्वतः या पोटनिवडणूकीवर लक्ष ठेवून आहेत. चिंचवड पोटनिवडणूक सहानुभूतीची नसल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांना निवडून देण्याचे ते आवाहन ते करत आहेत. हे पाहता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर टीका करत चिंचवड पोटनिवडणूकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना प्रचंड मतांनी विजयी करत अजित पवारांना ४४० वॊल्ट चा करंट द्या असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित बैठकीत बोलत होते.