भाजपाच्या कसब्याच्या मतदारसंघात गिरीश बापट हे मार्गदर्शन करताना पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडुन टीका करण्यात आली आहे. त्याबाबत भाजपाचे नेते माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, 'गिरीश बापटसाहेब १९६८पासून प्रचारामध्ये सहभागी होत आलेले आहेत. त्यामुळे घोडा किती ही म्हातारा झाला तरी पळतो. सिंह किती ही म्हातारा झाला तरी मांस खातो. त्यामुळे गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची एक खुजली आहे'