अजित दादांनी झापलं, गौतमी पाटील घाबरली _ दादा मला माफ करा Ajit Pawar on Gautami _HD

Views 2

पुणे : माझ्याकडून काही चुका झाल्या. मात्र लोकांनी माझ्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सुधारल्या. तेव्हापासून माझ्या नृत्यावर आक्षेप घेतले जात नाहीत. तेव्हापासून मी अश्चील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. पण तरीही माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा, असे डान्सर गाैतमी पाटीलने म्हटले आहे.

अलिकडेच अशिल डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. पदाधिका-यांनी असे कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी सूचनाही अजित पवारांनी केली होती.

राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली होती. यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालावी. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या हाेत्या. त्यावरून गाैतमीने माफी मागितली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS