२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मदार या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचाही पुरस्कार मिळाला. याच निमित्ताने भेटुयात मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर आणि त्यांच्या टीमला...