चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीतून महाविकास आघाडीचे बंडखोर नेते, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे माघार घेणार का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आज उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सचिन अहिर आणि राहुल कलाटे यांची दीड तास चर्चा झाली. त्यानंतर सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांच्याकडे बोट दाखवत ते भूमिका स्पष्ट करतील, असं सांगितलं आहे. आता राहुल कलाटे हे त्यांच्या पद्धकाऱ्यांसोबत बैठक घेत असून त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतील.