गेला आठवडाभरात टर्की आणि सीरियात भूंकपामुळे माजलेला हाहाकार भयानक होता. हजारोंच्या संख्येत नागरिकांचे जीव गेले. तर कित्येक जण जखमी झाले. एका पाठोपाठ एक झालेल्या भूकंपामुळे टर्की, सीरिया आणि आसपासच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सॅटेलाईटद्वारे भूकंपाआधी आणि नंतरची काही छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत.