Sanjay Raut on PM Modi: मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका
वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मुंबई पालिका निवडणुकीची तारीख ठरत नाही, तोपर्यंत नरेंद्र मोदी यांचा मुक्काम मुंबईत राहील यात शंका नाही. मात्र मोदी कार्ड जरी वापरलं तरी मुंबईत शिवसेनाच येणार, असं देखील त्यांनी ठणकावलं