ज्या मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे शिवसेना-भाजपा ही २५ वर्षांची युती तुटली, त्याच मुख्यमंत्रीपदाची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे पुढील वर्षीच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असणार? याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी जाहीर कार्यक्रमात केलेलं एक विधान या चर्चेला कारणीभूत ठरलं आहे. आपल्या भाषणात बोलताना निलेश लंकेंनी राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे.
#AjitPawar #SharadPawar #NileshLanke #Shivsena #UddhavThackeray #ShahajiBapuPatil #BacchuKadu #NCP #Nashik #EknathShinde #BJP #Shivsena #SadaSarvankar #Politics #Worli #Mumbai #Maharashtra