Cow Hug Day: व्हॅलेंटाईन डे ला गायीला मिठी मारायची?; केंद्राचं पत्रक नेमकं काय?
१४ फेब्रुवारीला सगळीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. तरुणाईमध्ये याची सर्वाधिक क्रेज पाहायला मिळते. मात्र या दिवशी आता cow hug day देखील साजरा केला जावा, असं आवाहन केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पशु संवर्धन मंडळानं केलंय. या संदर्भात एक पत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार गायप्रेमी नागरिकांनी १४ फेब्रुवारीला गायीला मिठी मारत हा दिवस साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे हा cow hug day सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.