काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे सांगितले. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्याबाबत मला काहीच माहित नाही असं तांबे यांनी सांगितले आहे. थोरात यांच्यासारख्या नेत्यांवरती जर राजीनाम्याची वेळ येत असेल तर काँग्रेस पक्षाने याचा आत्मचिंतन करायला हवे, असेही सत्यजीत तांबे यांनी वक्तव्य केले.