शिवरायांच्या शौर्याची साक्ष म्हणून युद्धनौकेचं उभारलं जाणार स्मारक
भारतीय नौदलात आपल्या पराक्रमी शौर्याद्वारे मानाचं स्थान मिळवलेली T-80 ही युद्धनौका अखेर कल्याणच्या खाडी किनारी दाखल झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमधून जलमार्गाने या युद्धनौकेचा कल्याणच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या प्रस्तावित स्मारकासाठी ही युद्धनौका केडीएमसीकडून कल्याणमध्ये आणली गेली आहे. #indiannavy #india #t-80 #kalyan #durgdikilla