प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या पटांगणात एका लहानग्याने लोकशाहीवर दिलेलं भाषण सध्या महाराष्ट्रभर गाजतंय. भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर असं या लहान मुलाचं नाव आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या मतदारसंघातील असलेल्या या विद्यार्थ्याला घरी बोलावून त्याचा सत्कार आणि कौतुक केलं आहे. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.