संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा आर्थिक पाहणी अहवाल तसेच अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले. 2, 4 उद्योगपतींना समोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्प मांडू नका. देशातील मजूर, शेतकरी, सामान्यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करा, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
#SanjayRaut #NarendraModi #Budget #Shivsena #BJP #HWNews #Budget2023 #UnionBudget2023 #UnionBudget #FinanceMinister #NirmalaSitharaman