महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत:च पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी कोश्यारींनी त्यांच्याकडे राजीनामा दिल्याची बातमी आली होती. तसं पत्र सुद्धा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं. पण कोश्यारींचा राजीनामा जर स्वीकारण्यात आला तर महाराष्ट्राचे पुढचे राज्यपाल कोण होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यपाल पदासाठी काही नावे चर्चेत आहेत.
#Maharashtra #Governor #BhagatSinghKoshyari #ShivSena #BJP #AmarinderSingh #PMModi #EknathShinde #DevendraFadnavis #SumitraMahajan #Mumbai #Rajyapal