शिवशक्ती आणि भीमशक्तीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून गदारोळ सुरु आहे. 'शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत' असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिला आहे.