ठाकरे सरकारमध्ये आपल्याला अटक करण्याचा डाव होता, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना नेमकी कोणत्या गुन्ह्याची भीती आहे, असा उलट सवाल केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.