Balasaheb Thackeray Oil Painting: तैलचित्र रेखाटणाऱ्या चंद्रकला कदम यांची प्रतिक्रिया
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचं अनावरण विधानभवन येथे होणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर तैलचित्र रेखाटणाऱ्या चित्रकार चंद्रकला कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या कलेला दाद द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.