Gold idol of PM Modi: नरेंद्र मोदींची सोन्याची मूर्ती साकारण्यामागे आहे 'हे' कारण
गेल्या महिन्यात पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं. या पार्श्वभूमीवर सुरतमधील दागिने बनवणाऱ्या कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती साकारली आहे. १८ कॅरेट सोन्यानं बनवलेली ही मूर्ती १५६ ग्रॅम वजनाची आहे. सध्या या मूर्तीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.