Viral Video: तरुणीनं २९ सेकंदातच विश्वविक्रमाला घातली गवसणी, बुद्धीच्या खेळात रचला विक्रमाची नोंद
पॉंडेचेरीच्या एस. ओडेलिया जॅस्मीन या तरुणीने बुद्धीचा कस लावून थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच केला आहे. जॅस्मीनने अवघ्या २९.८५ सेकंदात बुद्धीबळाचा सेट बोर्डावर व्यवस्थित लावला. या चमकदार कामगिरीमुळं जॅस्मीनला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा किताब मिळाला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्रामपेजवर या तरुणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.