केरळ सरकारने उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीची रजा जाहीर केली आहे. उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी ही घोषणा केली आहे. केरळच्या या निर्णयानंतर मासिक पाळीच्या रजेचा हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.