"काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ""महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार होतं. एका किमान समान कार्यक्रमावर तीन भिन्न पक्ष एकत्र होते. ज्या पद्धतीने आम्ही सरकार चालवलं. तोच समन्वय आणि तोच एकोपा विरोधी पक्षात असताना असायला हवा. तरच आपण पुढे जाऊ शकतो"", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
#SanjayRaut #SatyajeetTambe #SudhirTambe #UddhavThackeray #Shivsena #BJP #BalasahebThorat #Congress #DevendraFadnavis #INC #Nashik #Maharashtra