Pune Mpsc Protest: नव्या अभ्यासक्रमाला विरोध करत पुण्यात MPSCचे विद्यार्थी रस्त्यावर
Description:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरु आहे. परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भात हे आंदोलन केले जात आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी MPSCची तयारी करतात परंतु शासन आपले धोरण वारंवार बदलत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थ्यांचा 'जुन्या अभ्यासक्रमावर चांगला अभ्यास झाला होता त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम २०२५पासून लागू करण्यात यावा' अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर आले.
(रिपोर्टर: सागर कासार)