भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान बॉलर 'विदर्भ एक्सप्रेस' उमेश यादवच्या बॉलिंगवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फटकेबाजी करत पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे थाटात उदघाटन झाले. नागपुरात मानकापूर क्रीडा संकुलाच्या मैदानावर या महोत्सवाचं उदघाटन करण्यात आले. यावेळी मंचावर महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज याही उपस्थित होत्या.