बुलढाण्यातील खामगाव येथील सचिन अवताडे आणि योगेंद्र नाचणे या दोन पदवीधर तरुणांनी 'ग्रॅज्युएट' गुळाचा चहा या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. नोकरीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या तरूणांनी आज ते सत्यात उतरवलेलं दिसत आहे.