"उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारून मुंबईमधील चित्रपट उद्योग नष्ट करण्याचा घाट योगी आदित्यनाथ यांच्याकडून घातला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो. आदित्यनाथ यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे.
“मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
#yogiadityanath #uttarpradesh #filmcity #mva #jitendraawhad #bjp #uttarpradesh #devendrafadnavis #eknathshinde #hwnewsmarathi