राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे आता भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केले आहे.शरद पवार यांनी धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादावर भाष्य केले आहे. संभाजी महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत असतील तर त्यात काहीच वावगं नाही. महाराजांना धर्मवीर असं बोलणं काही चुकीचं नाही. संभाजी महाराज हा आस्थेचा विषय आहे, त्या भावनेतून कोणी धर्मवीर म्हणा की, स्वराज्यरक्षक म्हणा आपल्याला काहीच अडचण नाही, असे पवार यांनी भूमिका स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या वक्तव्याबाबत तशरद पवार म्हणाले की, ते स्वत: माध्यमांसमोर येऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.
#SharadPawar #AjitPawar #ChhatrapatiSambhajiMaharaj #Dharmaveer #NCP #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews