राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे म्हटले होते. यानंतर भाजप (BJP) नेत्यांनी तात्काळ अजित पवार यांच्याविरोधात रान उठवायला सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून अजित पवारांवर सातत्याने टीका केली जात आहे. संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. त्यांनी धर्मासाठीच बलिदान दिले, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. HW मराठीने मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी संवाद साधला असता टए म्हणाले की संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षकच होते.
#ajitpawar #PurushottamKhedekar #sambhajibrigade #sambhajimaharaj #history #bjp #ncp #mahavikasaghadi #hwnewsmarathi #maharashtra