पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले. पार्थिवाला यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं होतं. मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला. रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी गांधीनगरमधील घरी पोहोचले. आईच्या पार्थिवाचं दर्शन त्यांनी घेतलं. यावेळेस मोदींच्या गांधीनगरमधील घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.
#HeerabenModi #PMModi #RishabhPant #Ahmedabad #Pele #CarAccident #LastRites #Gandhinagar #Crematorium #Demise #PMModiMother #HWNews