"विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसऱ्या दिवसाचे कामकाजाला सुरुवात झाली असून तत्पूर्वी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्या डिग्रीवरही त्यांनी भाष्य केलं. तुम्हाला आमदार, मंत्री होण्यासाठी जे काही कायदे आणि नियम आहेत ते बघितले पाहिजे. डिग्री बोगस आहे की काय याला काही अर्थ नाही. मागेही मंत्र्यांवर असेच आरोप झाले. काहींच्या शिक्षण संस्था असल्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळतात. अशांना काय बोलायचं? असा चिमटाही त्यांनी काढला.
#AjitPawar #UdaySamant #AbdulSattar #DevendraFadnavis #WinterSession #MaharashtraAssembly #VasantPatil #EknathShinde #DevendraFadnavis #Politics #Maharashtra