राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज राज्य सरकार विधिमंडळात सीमाप्रश्नावर ठराव मांडणार असल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
#SanjayRaut #BorderDispute #Maharashtra #Karnataka #Belgaum #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #WinterSession #Nagpur #MaharashtraKarnatakaBorder