राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज ११ वाजता विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास होता. हा तास सुरू होण्यापूर्वी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस सरकारच्या काळात वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची चर्चा करण्याची मागणी केली. यानंतर अजित पवार यांनी देखील यावरून महत्त्वाचे प्रश्न मांडले. महत्त्वाच्या पदावर बसल्यानंतर भेदभाव करून चालत नाही. विधानसभा सदस्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं विधानसभा अध्यक्षांचं कर्तव्य आहे, असं अजित पवार म्हणाले.
#vidhansabha #rashmishukla #AjitPawar
#nanapatole #devendrafadnavis #phonetappingcase #bjp #Maharashtra #hwnewsmarathi