विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाची सुरवात होत असताना. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर चक्क सत्ताधारीच आंदोलन करताना दिसले. सुषमा अंधारे यांनी केलेल्या संतांबद्दलच्या विधानाच्या निषेधार्थ आज सत्ताधारी आमदार निषेध करताना दिसून आले. 'विठ्ठालाचे नाही धरले पाय आघाडीचे करायचे काय?' अशा आशयाचे फलक घेऊन सत्ताधारी आमदार घोषणाबाजी करताना दिसून आले.