विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकांमुळे गाजला. विधिमंडळात जयंत पाटील यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, 'कर्नाटक सरकारला जर मस्ती चढली असेल तर आपल्याकडील धरणांची उंची वाढवू कारण त्याच्याशिवाय हे ताब्यात येणार नाहीत' त्यावर शिंदे यांनी देखील उत्तर देताना हे सरकार सीमावासीयांच्या पाठीशी आहे.