'सावेसाहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून इतके बदलायेत, मी देवेंद्रना दहादा सांगतोय,सावेसाहेब तुम्ही मंत्री झाल्यावर इतकं बदलायचं नसतं' अतुल सावे यांची अशी फिरकी घेत अजित पवारांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला. अजित पवार एवढ्यावर थांबले नाहीत तर 'सत्ता येते अन् सत्ता जाते, माणसं जोडायची असतात' असा मोलाचा सल्लाही अजितदादांनी अतुल सावे यांना दिला.