पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना शाई फेकीची धमकी दिली गेली आहे, त्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडच्या सांगवीत पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून येतोय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाच वाजता पवनाथडी जत्रेचे उद्घाटन करणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने या जत्रेचे आयोजन केलेले आहे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ७०-८० जवान तैनात करण्यात आलेत, अतिरिक्त पोलिसदेखील याठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत.