महामोर्चा करणाऱ्यांना काही काम नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज उत्तर दिलं. यावेळी त्यांनी यांचं महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.