पिंपरी चिंचवडमध्ये चारचाकी चालकाने ब्रेकवर पाय देण्याऐवजी चुकून एक्सलेटरवर पाय दिल्याने अपघात झाला. या अपघातादरम्यान चारचाकीची स्कुल व्हॅनला जोराची धडक लागता लागता राहिली असून एक मोठा अनर्थ टळलाय पण या अपघातात एका दुचाकीला धडक लागल्याने एक शाळकरी मुलगा मात्र जखमी झाला आहे. या अपघाताची थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे.