"गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. दोन आठवड्यांपूर्वी जत तालुक्यातील गावांच्या कर्नाटकमध्ये जाण्याच्या मागणीवरून सुरु झालेला हा वाद आता रस्त्यांवर होणाऱ्या हिंसेपर्यंत आला आहे. 3 दिवसांपूर्वी कर्नाटकातील एक गावात महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनावर कन्नड रक्षण वेदिकेकडून हल्ला केला गेला. गाड्यांवर दगडफेक केली गेली आणि पोस्टर्स सुद्धा फाडले गेले. त्यानंतर सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील राजकारणातही याचे पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही असा भ्याड हल्ला सहन करणार नाही आणि हा विषय अमित शाह यांच्यासमोर मांडू असे आश्वासन दिले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला ultimatum दिला. आणि स्वतः बेळगावला जाण्याचा इशारा सुद्धा दिला. तो ultimatum संपला. अजून तरी शरद पवार यांनी त्यांच्या बेळगाव दौऱ्याबद्दल काही खुलासा केलेला नाहीये. तर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी २ दिवसांपूर्वी tweet केले कि एकनाथ शिंदेंशी त्यांची फोनवरून बातचीत झाली पण सीमावादावर त्यांची भूमिका कायम आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून हा मुद्दा लोकसभेमध्येही गाजतो आहे. महाराष्ट्राचे खासदार आज यासंदर्भात अमित शाह याना भेटले.
आता या सर्व घटनेवरून वातावरण तापले असताना असा प्रश्न सतत पडतो कि हा ५० वर्षांपासून सुरु असलेला वाद पुन्हा उकरून का काढला जातोय? महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादातील नवीन घटना scripted तर नाहीत ना?
#Maharashtra #Karnataka #MaharashtraKarnatakaBorder #BasavarajBommai #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis