Chandrakant Patil News : राज्यात महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू आहे. याचदरम्यान, भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवरील केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 'कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे